सय्यद जहीर लोणार
डॉ. गोपाल बछिरे यांची संपूर्ण बुलढाणा जिल्हा संघटक पदी पुनर निवडीचे आदेश सामना वर्तमानपत्राच्या माध्यमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
buldhananews:मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पद नियुक्ती संदर्भात चर्चा झाली त्या चर्चेत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत यांनी डॉ.
गोपाल बछिरे या अगोदर घाटावरील सहा तालुक्याचे जिल्हा संघटक होते त्यांच्या संघटन कौशल्य व संघटन बांधणी संदर्भात कल्पक दृष्टिकोनाचा विचार करून त्यांचा पदभार वाढवून त्यांच्यावर संघटन बांधणी व वृध्दी या दृष्टिकोनातून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात यावी
अशी मागणी केली व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्या मागणीस मान्यता देऊन सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर करून डॉ. गोपाल बछिरे यांच्यावर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा संघटक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
या निवडीबद्दल जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र भाऊ खेडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुधवत, वसंतभाऊ भोजने, उपजिल्हाप्रमुख आशिषभाऊ रहाटे, बद्रीभाऊ बोडखे,
कपिलभाऊ खेडेकर, सुनीलभाऊ घाटे, तुकाराम काळबांडे, अविनाश दळवी, संजयसिंग जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कराडे, महिला जिल्हा संघटिका विजया खडसन, चंदाताई बढे, संजीवनी वाघ, पार्वती ताई सुटे तालुकाप्रमुख, लखनभाऊ गाडेकर, लिंबाजी पांडव, महेंद्र पाटील, दादाराव
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
खाडे, श्रीकृष्ण धोंडगे, श्रीराम खेळदार, हर्षल आखरे, रवींद्र साळोकार, गजानन वाघ, ईश्वर पांडव, दीपक चांभारे पाटील, शहर प्रमुख गजानन जाधव, किशोर गारोळे, परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, जीवन घायाळ, सिद्धेश्वर आंधळे, एड. आकाश घोडे, ऋषी जगताप, श्रीकांत मादनकर,
buldhananews:बंडूभाऊ जोगदंड, लूकमान कुरेशी, सुदन अंभोरे, तानाजी मापारी, गोपाल मापारी, तानाजी अंभोरे, राजूभाऊ बुधवत, लालूभाई मुल्लाजी, रमेशभाऊ भानापुरे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून डॉ. बछिरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे