प्रतिनिधी :- सचिन वाघे
Hingnghat:हिंगनघाट: रोटरी क्लब हिंगनघाटच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष जितेंद्र वर्मा यांनी सांगितले की, “रक्तदान महादान आहे, आणि रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.”
यावर्षी 500 युनिट रक्तदान करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्रकल्प संचालक केदार जोगलेकर आणि किशोर चांदनी यांनी इतर रोटेरियन सदस्यांसह महत्त्वाची भूमिका बजावली.
क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी यांनी रक्तदानाबद्दल पसरलेल्या गैरसमजुती दूर केल्या आणि आजच्या काळात प्रत्येक रुग्णालयात रक्ताची गरज असते असे सांगितले. अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते, आणि रक्ताला कोणताही पर्याय नाही.
त्यामुळे सर्वांनी नियमित रक्तदान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे, महिलांनाही जर त्यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असेल, तर त्यांनीही नियमितपणे रक्तदान करणे गरजेचे आहे.
या शिबिरात रक्तसंकलनासाठी खंडेलवाल ब्लड बँकेच्या टीम्सना आमंत्रित करण्यात आले होते.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रक्तदान शिबिराच्या यशासाठी रोटरी संस्थापक डॉ. अशोक मुखी, प्रा. अशोक बोंगिरवार, सचिव सुभाष कटारिया, प्रा. राजू निखाडे, किशोर चांदनी,
Hingnghat :पीतांबर चांदनी, मितेश जोशी, दिगंबर खंड्रे, अध्यक्ष सी.ए. जितेंद्र वर्मा, मंजुषा मुले, डॉ. सतीश डांगरे, शाकिर खान पठाण, प्रभाकर साठवणे, जितेंद्र केदार, सुरेश चौधरी, पुंडलिकजी बकाने, मुरली लाहोटी, माया मिहाणी,शशांक खांडरे,पटेलिया, उदय भोकरे,प्रा.शंकर बोंडे, आणि इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.