महाराष्ट्रातील ४०‌‌ सह्याद्री रत्नांमध्ये अनिल मोरे यांचा समावेश सह्याद्री रत्न पुरस्काराने अनिल मोरे सन्मानित ( buldhananews )

 

सय्यद जहीर लोणार /बुलढाणा

buldhananews:ऐतिहासिक वारसा आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला शोभुन दिसेल असा दिमाखदार सोहळा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम मंत्रालय वतीने सोहळा काल पार पडला.

राज्यभरातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अवलियांना ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सह्याद्री रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील मातब्बर या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील उत्कृष्ट ४० सह्याद्री रत्नां‌ना या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले‌ होते.विदर्भातुन सतत अग्रेसर असलेलं युवा नेतृत्व आणि आपली ओळख ही जिल्हा नव्हे तर गल्ली ते दिल्ली पर्यंत नेउन ठेवणारं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा.अनिल मोरे यांचा ही या ४० सह्याद्री रत्नांमध्ये समावेश होता.

आ.संजय गायकवाड सह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल.( sanjaygaikwad )

आपल्या सामाजिक कार्यातुन सतत गोरगरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच अनाथांना मदतीचा हात अनिल मोरे यांचा समोर असतो ‌‌.

चार वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक कार्य आणि बेरोजगार‌ महीला साठी सतत काम करत असतात.
ग्रामीण भागातील स्त्रियांना महिला उद्योजिका बनविण्यासाठी यांनी अतोनात मेहनत घेतली आहे..

बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशा व्यक्तीमवाला आज सह्याद्री रत्न पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरस्कार समिती अध्यक्ष डॉ दिपक जाधव, सिनेअभिनेत्री आर्या यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.

buldhananews :महाराष्ट्रातील ४०‌‌ रत्नांमध्ये माझं नाव येण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील माझे सामाजिक क्षेत्रातिल‌ सहकारी, मित्र, आणि परिवार‌ या सर्वांचा खुप सिंहाचा वाटा आहे , असे यावेळी अनिल मोरे यांनी सांगितले .

Leave a Comment