कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर बलात्कार करून हत्या केल्याच्या निर्घृण घटनेच्या विरोधात शेगाव शहरात महिलांचा आक्रोश.. कॅन्डल मार्च काढून महिलांनी केला पश्चिम बंगाल सरकारचा जाहीर निषेध.( murdernews )

 

इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव / बुलढाणा

murdernews:शेगाव.महिला वरील अत्याचार बंद करण्याकरिता केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्याची केली मागणी..


शेगाव: संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या कलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधील प्रशिक्षु महिला डॉक्टर यांच्यावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केल्याच्या घटने प्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.

या मागणीसाठी शेगाव शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य कॅण्डल मार्च काढून पश्चिम बंगाल शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला व या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

नगर पालिकाचे कर निरीक्षकाला लाच घेतांना पकडले ( brekingnews )

शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शेगाव शहर अध्यक्ष अंजलीताई जोशी, डॉक्टर अंजुषा भुतडा, मंजू अशोक शर्मा लखपती गल्ली शेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थानिक अग्रेशन महाराज चौक परिसरात असलेल्या माहेश्वरी भवन समोरून महिलांचा भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला

अग्रेशन चौक येथून प्रारंभ करण्यात आलेला हा कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टी पॉईंट जवळुन शेगाव नगरपालिका कार्यालया जवळील गांधी चौक परिसरात पोहोचला.

कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर बलात्कार करून हत्या केल्याच्या निर्घृण घटनेच्या विरोधात शेगाव शहरात महिलांचा आक्रोश.. कॅन्डल मार्च काढून महिलांनी केला पश्चिम बंगाल सरकारचा जाहीर निषेध.( murdernews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शेगाव शहर अध्यक्ष अंजलीताई जोशी, डॉक्टर अंजुषा भुतडा, डॉक्टर निदा हुसेन यांनी कोलकत्ता येथे महिला डॉक्टराच्या हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून केंद्र सरकारने याप्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

murdernews:कॅन्डल रॅलीत भारतीय जनता पक्षाचे शेगाव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, संजय त्रिवेदी, राजकुमार व्यास, दीपक शर्मा, कीर्ती संघानी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment