लोणार प्रतिनिधि सय्यद जहीर
lonarnews:अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला प्रेरीत करून एकसंघ करणारे असे वक्तव्य आपल्या भाषणातून प्रा.डॉ. गोपाल बछिरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले.
शारा येथेल समाज सभामंडपात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना पुढे डॉ.बछीरे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, व पुरोगामी विचारांचे अनुयायी त्या कारणाने अण्णाभाऊ साठे ओळखले जातात आणि त्यांनी समाजाला प्रेरित करून एकसंघ करण्याचे मौलिक कार्य केले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
समाजाने एकसंघ राहावं एकमताने राहावं तरच त्या समाजाची किंमत होते अन्यथा, गुच्छात असलेल्या द्राक्षाची किंमत जास्त असते व गुच्छ्यातून तुटलेल्या द्राक्षाची किंमत मातीमोल तशी समाजाची परिस्थिती आहे.
एक संघ असाल तर त्या समाजाची किंमत होईल व वेगवेगळे व्हाल तर मातीमोल. असे अनेक दृष्टांत देऊन त्यांनी समाजएकसंघ राहण्याचे मूलमंत्र दिले याप्रसंगी
lonarnews:कार्यक्रमास लोणारचे पोलीस निरीक्षक निमिश मेहत्रे, शिवसेनेचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, परमेश्वर दहातोंडे, लुकमान कुरेशी, तानाजी मापारी, इक्बाल कुरेशी, सुदन अंभोरे आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संदीप साठे संतोष साठे सुभाष साठे उद्धव साठे आदींनी परिश्रम घेतले.