यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
Yavalnews:येथील सातपुडा पर्वताच्या रांगेतील आदिवासी तालुका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षापासुन विविध समस्या निर्माण झाल्या असुन,या समस्यामुळे नागरीकांचे आरोग्यावर मोठा परिणाम झाला.
असुन,प्रशासनाने या बाबत तात्काळ निर्णय घेवुन अशा मागणीचे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावलच्या तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येवुन ग्रामीण रुग्णालया संदर्थात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते उपस्थित होते .
दरम्यान येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे संघटेनेचे महिला जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांनी यावेळी सांगितले आहे . यावल ग्रामिण रुग्णालयात कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणुक करण्यात यावी या संदर्भात आम्ही वारवांर निवेदण दिले परंतु जाणिव पुर्वक आमच्या मागणी कडे आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे.
देशाची आर्थिक प्रगती महासत्तेकडे नेण्यासाठी अर्थसंकल्प :- आ. डॉ. संजय कुटे ( dr sanjaykute )
यावलच्या ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदाची सर्वपदे गेल्या अनेक वर्षापासुन रिक्त असुन, या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याकारणाने गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे भविष्यात जिवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
असे निवेदण तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यावल यांना आंदोलनाअंती देण्यात आलेल्या मुख्य मागण्या पुढील प्रमाणे
१) गर्भवती महिलांच्या प्रसुतीच्या वेळी सिजरची आवश्यकत भासल्यास तात्काळ व्यवस्था करण्यात यावी .
२) नवजात शिशू करिता अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करणे .३ ) कुटंब नियोजन शस्त्रक्रिया शुरुवात करण्यात यावी.४ ) शस्त्रक्रिया गृह कार्यान्वीत करण्यात यावे,५ ) शवविच्छेदन गृहामध्ये शव सुरक्षे करिता शितकालिन व्यवस्था करण्यात यावी ,६ ) नेत्र चिकित्सक तज्ञांची नेमणुक करून चिकित्सा करून७ )रुग्ण वाहीका वेळेवर उपस्थिती करिता उपाय योजना करण्यात यावी.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
८ ) आपातकालिन समयी रक्ताची गरज असते त्या एखाद्याचा जिवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो त्याकरिता रुग्णालयात रक्तपेढी ची स्थापना करण्यात यावी .
यावल तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असुन अनेक वेळेस तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते त्यामुळे शासन प्रशासनाने या जनहिताच्या मागणिकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संघटनेच्या वतीने भविष्यात तिव्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .
Yavalnews:त्या प्रसंगी संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत फैजपुर विभाग उपाध्यक्ष अनिल ईंधाटे , तालुका अध्यक्ष विलास तायडे , लक्ष्मीताई मेढे ,निकिता भावटे . मनिषा लोखंडे ,मंदा साळवे . उपाध्यक्ष इकबाल तडवी ,दिपक मेढे ,संजय तायडे ,जितेंद्र मेढे , अनिल तायडे ,सागर तायडे ,जगन तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते