इस्माईल शेख सह अमिन शेख
buldhananews:शेगाव: स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने धान्य वितरणाचे कमिशन दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मिळावे या व इतर मागण्यासाठी चे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने शेगाव येथील तहसीलदार यांना सोपविण्यात आले..
विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews )
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की धान्य दुकानातून ग्राहकांना धान्य वितरण व ई केवायसी नोंद ही पोस्ट मशीनद्वारे करण्यात येत आहे.
मात्र सर्वरमध्ये वारंवार प्रॉब्लेम येत असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत अनेक वेळा हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचलेले आहेत त्या कारणाने रेशन धान्य दुकानदारा विरोधात असंतोष निर्माण होताना दिसत आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत ठोस पर्याय काढण्यात यावा तसेच इ के वाय सी चे काम इतर सेवा केंद्र मार्फत करण्यास परवानगी देण्यात यावी आधी मागण्या करण्यात आल्या आहेत अन्यथा ही केवायसी कामावर बहिष्कार घालण्याचा इशाराही या निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
buldhananews:निवेदन देताना स्वस्त धान्य संघटनेचे शेगाव शहराध्यक्ष मंगेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष विजय भालतीळक दीपक धमाल विनोद लांजुळकर सोनू मोहोळ जि.ओ काळे मोहन धनोकार मंगेश ढोले अक्षय देशमुख गोपाल पल्हाडे व इतर उपस्थित होते.