बिबी परिसरामध्ये साथीच्या रुग्णात वाढ आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज.( brekingnews )

तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:बिबी परिसरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असून.डोकेदुखी, सर्दी, ताप, खोकला, संडास, उलटी, व्हायरल इन्फेक्शन च्या साथीने रुग्ण बेजार आहे ,

सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र डास ,मच्छर यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन मुळे बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

परंतु बिबी ग्रामीण रुग्णालयात तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी पदावर असून सुद्धा दोन डॉक्टर स्वतःच्या सोयीनुसार नोकरी करत असल्याची चर्चा रुग्ण नातेवाईकांकडून होत आहे.

एमबीबीएस डॉक्टर नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. व आयुष विभागाच्या डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेऊन समाधान माणून माघारी फीरावे लागते व खाजगी उपचार घ्यावे लागत असून गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

तसेच बीबी येथे पोलीस स्टेशन असल्यामुळे आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांकडून होणे गरजेचे असते तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळकरी मुलं यांना फिटनेस साठी नियमित वैद्यकीय दाखल्याची गरज असते मात्र येथे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी हजर राहत

नसल्यामुळे तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी दाखले आणावे लागत असल्याचा मनस्ताप ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनातेवाईक सर्वांनाच होत आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तरी संबंधित आरोग्य विभाग दखल घेईल का ? याकडे रुग्ण नातेवाईक जनतेचे लक्ष लागून आहे.

brekingnews: तपासणीसाठी आयुष विभागात झालेली महिला ,पुरुष जेष्ठ नागरिक ,बालक गर्दी. तर भरती असलेले रुग्ण .

Leave a Comment