आठ दीवसात सुविधा ध्या अन्यथा ठीय्या आंदोलन ( andolannews )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

andolannews:येत्या आठ दीवसात बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुख सुविधा द्या अन्यथा ठीय्या आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचा ईशारा,

बीबी ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची तसेच गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली रक्त लघवी तपासणीची मशीन तात्काळ नवीन उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,

बीबी येथील ग्रामीण रुग्णालय हे लोणार तालुक्यातील सर्वात मोठे 30 खाटांचे रुग्णालय आहे रुग्णालयामध्ये 3 अधिकारी कार्यरत असून त्यापैकी एक अधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट बेस वर आहे.

दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास नगरपालिकेला कुलूप लावू :-डॉ. गोपाल बछिरे ( buldhananews )

तर दुसरे एक अधिकारी हे बीबी येथे कार्यरत असताना ते बीबी येथे उपस्थित न राहता खामगाव या ठिकाणी ड्युटी करतात तर उर्वरित एक महिला अधिकारी ह्या नेहमी सुट्टीवर असतात गेल्या काही महिन्या अगोदर या रुग्णालयापासून जवळच असलेल्या खापरखेड घुले सोमठाणा

या गावांमध्ये भगरी मधून काही लोकांना विषबाधा झाली असता शेकडो विषबाधा झालेल्या लोकांना ग्रामीण रुग्णालय बीबी येथे आणले असता त्या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता तर दुसरीकडे या रुग्णालयातील रक्त लघवी तपासणी मशीन ही गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना खाजगी लॅबमधून रक्त लघवी तपासून आणावी लागते त्यामुळे गोरगरीब रुग्णावर याचा फार मोठा भुर्दंड पडत आहे.

andolannews:तरी येत्या 1,जुलै पर्यंत रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी व रक्त लघवी तपासणी मशीन उपलब्ध करून न दिल्यास रुग्णालयामध्ये बेमुदत ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सहदेव लाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे निवेदनावर कार्तिक धाईत, आणिल लांडगे, ऋषिकेश धाईत ,भागवत मुळे, तुषार मुर्तडकर ,उद्धव आटोळे ,राम डुकरे, चेतन ढाकणे ,सागर मुर्तडकर, अजय कायंदे ,पांडुरंग कुलकर्णी ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Comment