अनिल सिंग चव्हाण ( मुख्य संपादक )
Breakingnews:बुलढाणा :- जिल्हातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या गट ग्रामपंचायत लाडणापूरच्या ग्राम चिचारी येथे निर्माणधीन पाण्याची टाकी कोसळल्याची घटना १२ जून च्या मध्य रात्री तालुक्यातील लाडणापूर गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली.
मध्यरात्री कोसळलेल्या निर्माणधीन पिण्याच्या पाण्याचे टाकीची घटना घडून १० दिवस झाले. परंतु अध्यापही शासनाच्या वतीने संबंधित कॉन्ट्रॅक्ट दारावर कुठलीही कारवाई झाली नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली.
ही टाकी कोसळल्याचा आरोप संग्रामपूर येथील ऍड. जी. ए. क्षीरसागर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना लेखी तक्रार द्वारे केली आहे.
या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या कार्यावर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
रात्रीच्या वेळी टाकी कोसळल्याने जीवित हानी झाली नाही. तरीही घडलीली घटना ही गांभीर्य जनक असून शासनाने याची दखल १५ दिवसात घ्यावी.
चिचारी येथील पाणी पुरवठा पाईपलाईन व पाण्याच्या टाकीच्या इस्टिमेट रद्द करा / लायसन्स ब्लॅक लिस्ट मध्ये टाका :- अॅड गणेश क्षीरसागर ( Breakingnews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार संबंधी चौकशी करून संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदारावर कठोर कारवाई करून त्यांचा कॉन्ट्रॅक्ट परवाना रद्द करावा.
Breakingnews :अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ऍड. जी. ए. क्षीरसागर यांनी दिला आहे.