rain news:अकोला : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान सुरू होउन रात्रि १० वाजे प्रर्यत कोसळला. . काल रात्री देखील सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र जलमय वातावरण झाले आहे.
हवामान तज्ज्ञांनी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी सुखावले आहेत.जिल्ह्यात यंदा उन्हाचा पारा चांगलाच चढला होता. उष्णतेच्या लाटेचा जिल्ह्याला फटका बसला आहे.
जिल्ह्यातील तापमानाने ४५ अं.से.चा टप्पा देखील ओलांडला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्ह व सावलीचा खेळ सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
सुमारे एक तासापर्यंत पावसाचा जोर कायम होता. सर्वत्र पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरातील अनेक भागांत रात्रभर वीज पुरवठा नव्हता.
मुर्तीजापुर तालुक्यात अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…( formernews )
पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड झाला असून दुरुस्तीचे कार्य सुरू होते.सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान सुरू झाले ला पाऊस रात्रि १० वाजे प्रर्यत कोसळला.
जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वीज कोसळल्याने दोघाचा मृत्यू जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वीज कोसळल्याने एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत एक युवक शेतात मृत आढळून आला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचाही मृत्यू वीज कोसळून झाला असावा, अशी चर्चा आहे. पहिल्या घटनेत, मूर्तिजापूर तालुक्यातील टीपराळा येथील शालिग्राम श्रीराम डोंगरे (वय वर्ष 65) हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
rain news:याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे. त्याचप्रमाणे, मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (वय अंदाजे 26 वर्ष) हे युवक सोपान टापरे यांच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आले. त्यांचा विजेमुळे मृत्यू झाला अशी चर्चा आहे.