संग्रामपूर( रामेश्वर गायकी ) सूर्या मराठी न्यूज ब्युरो
Bendwad bhavishyvani 2024:बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका लगतच असणाऱ्या जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाऊस ,पीक पाणी व राजकीय बाबीचा अंदाज दुसऱ्या दिवशी वर्तवला जातो. ही परंपरा 370 वर्षापासून वाघ महाराज यांच्याकडून सुरू आहे.
ह्या वर्षात पीक सर्वसाधारण तर रब्बी पीक चांगले दाखविण्यात आले. पाऊस हा सुरुवातीला कमी नंतर जास्त प्रमाणात राहील. यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून राजकीय विश्लेषण सांगण्यात आले नाही.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भेंडवळ येथे काल रात्री अक्षय तृतीया दिवशी एका शेतात घट मांडणी होवून आज दि.११/ मे रोजी सकाळी वाघ महाराज यांच्याकडून सर्व उपस्थित नागरिकां समोर पाऊस व पीक पाणी भाकीत सांगण्यात आले.
त्यामध्ये ह्या वर्षात कापूस, ज्वारी ,मुग ,उडीद, मठ, लाख ,वाटाणा हरभरा ही पिके सर्वसाधारण राहणार असून काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात येतील. त्यात काहींची नासाडी होईल रोगराई राहणार! तर तीळ,जवस, तांदूळ ,गहू ,बाजरी, करडई, ही पिके चांगली येतील.
पावसाचे बाबतीत जून मध्ये कमी व लहरी पाऊस ,जुलै मध्ये सर्वसाधारण तर ऑगस्टमध्ये चांगला आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होवून नुकसान होऊ शकते, अवकाळी पाऊस राहीलच व नुकसान होईल देशाच संरक्षण खातं चांगलं मजबूत राहील.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आर्थिक स्थिती सुद्धा चांगली राहील. मात्र देशाचा राजा व राजकीय बाबी ह्या लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहीतेमुळे सांगितले नाही.
Bendwad bhavishyvani 2024:ह्या घट मांडणीसाठी व भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खान्देश व इतर भागातून शेतकरी व्यापारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. अनेकांनी या घट मांडणीवर श्रद्धा व विश्वास शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.