अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावल येथे काळभैरव महाराज यात्रा बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न ( AkshayaTritiya )

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

Akshaya Tritiya:यावल शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावल येथे काळभैरव महाराज यात्रा निमित्ताने पारंपारिक बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बारागाडया भगत किशोर रूपा बारी यांनी ओढल्या तर त्यांना बगले म्हणुन प्रवीण सुरेश भालेराव, निलेश बापू पारधे यांनी साथ दिली. सदरच्या गाड्या यावल-फैजपुर रोडवरील पांडुरंग सराफ नगर जवळील मनुदेवी मंदिरापासून तर शहरातील बुरुज चौकापर्यंत बारागाडया ओढण्यात आल्या.

यावलसह परिसरातील नागरिकांनी बारागाड्या बघण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. भगत व भाविक बारीवाड्यापासून वाजत गाजत मेन रस्त्याने काळभैरव मंदिरात आली.

अकरा वर्षानंतर निकाल पुराव्या अभावी दोन जणांना अखेर जन्मठेप मुख्य आरोपीसह तिघे निर्दोस 🙁 narendra dabholkar murder )

तिथून दर्शन घेऊन पांडुरंग सराफ नगरातील बहिरम बुवा मंदिराजवळ दर्शनासाठी जातात व तिथून आल्यावर पाच प्रदक्षिणा बारा गाड्यांना केल्यानंतरच बारा गाड्या ओढल्या जातात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Akshaya Tritiya:संध्याकाळी सर्व शहरातील भाविकांनी व नागरिकांनी बारा गाड्या पाहिल्या.

Akshaya Tritiya:यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

Leave a Comment