सूर्या मराठी न्यूज ब्युरो /बुलढाणा
dieselnews:बुलडाणा : नांदुरा मलकापूर रोडवरील लाजवाब धाब्याच्या जवळील एका टीनपत्रात अवैधरित्या बायोडिझेल साठवून ठेवल्याची माहिती नांदुरा पोलिसांनी मिळाली. दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी केली असता पोलिसांना बायोडीजेलसह एकूण १७ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
आज गुरूवार, (दि.२) मे रोजी सकाळी ८ वाजेच्या आसपास नांदुरा पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईनंतर सरकारच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून अब्दुल हमीद अब्दुल बासीत (४२ वर्ष) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकासह नांदुरा मलकापूर रोडवरील एका टिनशेड मध्ये छापा मारला असता ५ लाख ७४ हजारांचा पेट्रोल सदृश्य द्रव पदार्थ अंदाजे ८२०० लिटर तसेच जीजे १५ एक्स ८१३१ क्रमांकाचा ट्रक किंमत १० लाख , १४ हजार
जळगाव (जामोद) येथे माळीखेल मधील विहीर चे काम रखडले ( vihir news )
किंमतीचे मोठे पांढऱ्या रंगाचे ७ बॅरेल, निळ्या रंगाचे सहा बॅरेल किंमत ६ हजार, ५ हजार किमतीची एक इलेक्ट्रिक मोटर, डिझेल काढण्यासाठी वापरल्या जाणारा ३० फूट
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
dieselnews:पाईप किंमत १५०० रुपये , esaar कंपनीची दोन नोझल असलेली डिझेल मशीन असा एकुण १७ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास एपीआय सतीश आडे हे करीत आहेत.