प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली( Yavalnews )

 

 

यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे

Yavalnews:यावल येथील महसुल प्रशासनाच्या वतीने शहरांमध्ये नागरिकांमध्ये मतदान विषयी जनजागृती करण्यासाठी रॅली व प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले.

या जनजागृती रॅलीत ह. भ. प. संचित कोळी महाराज, यावलच्या सरस्वती विद्यामंदिर शाळा व इतर शाळांमधील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला या रॅलीतून मतदानाच्या हक्का संदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली.

याप्रसंगी यावल शहरातील शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते. या मतदानाविषयी जनजागृती कार्यक्रमाला फैजपुर विभागाच्या प्रांताधिकारी देवयानी यादव, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, रशीद तडवी, मुख्याध्यापक गजानन कुलकर्णी, मुख्याध्यापक एम. के. पाटील, विलास काटकर, यावल उर्दू विभागाचे केंद्रप्रमुख शाकीर शेख व यावल शहरातील शाळांमध्ये शिकवत असणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती होती. सर्वप्रथम गावातून रॅली काढून झाल्यानंतर यावल बस स्थानक येथे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कीर्तनाच्या माध्यमातून मतदानास साठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

अकोल्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 30 विद्यार्थिनींना काविळची लागण ( Akolanews )

डॉ नरेंद्र महाले सरस्वती विद्यामंदिर यावल हे सुद्धा व त्यांचे सहकारी विद्यार्थी यांनी कीर्तनामध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रबोधनाचे कार्य केले. कार्यक्रमाला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला.

यावलच्या बस स्थानक परिसरात विविध गावातून आलेले प्रवाशी नागरिक जे मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यांची या कीर्तनाला खूप मोठ्या प्रमाणात दाद मिळाली. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मतदानाचे कार्य पवित्र कार्य आहे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व यासाठी सर्वांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावा या संदर्भात मतदारांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी विद्यार्थ्यांना आपण देखील प्रबोधनाच्या या कार्यामध्ये सहभाग घेऊन,आपल्याला शक्य असेल तितके मतदानासाठी आपल्या गावातील नातेवाईकांना, मित्रमंडळींना, घरातील सदस्यांना ज्यांना मतदानाचा हक्क आहे त्यांना मतदान करण्यासाठी जागृत व प्रवृत्त करायचे असल्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या संदर्भात मतदारांना विशेष आवाहन केले.

Yavalnews:या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नरेंद्र महाले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार यावलच्या साने गुरुजी उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पाटील यांनी मानले

Leave a Comment