दोन महिन्यानंतर कामरगाव चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश ( vashimnews )

 

कामरगाव प्रतिनिधी कासिम बेग

vashimnews:धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथे 18 जानेवारीला पहाटे 3 वाजता अज्ञात चोरट्यांनी जिल्हा परिषद विद्यालया मागील शर्मा हार्डवेअर हे दुकान फोडून 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. सदर प्रकरणी दुकान मालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी


अज्ञात आरोपी विरुद्ध भा.द.वि.च्या कलम 461 व 380 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला होता अशातच अकोला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 मार्चला फरहान अहमद अब्दुल गफ्फार वय 30 वर्ष रा. चंद्रगुट्टा हैदराबाद, ह. मु. कापूसतळणी, ता. अंजनगाव, जि. अमरावती याला 24 मार्च रोजी ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता कामरगाव येथील शर्मा हार्डवेअर फोडून त्यातील नगदी रोकड चोरल्याची कबुली आरोपीने दिल्याने.

यावल ग्रामीण रूग्णालयात रूग्णांशी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे रूग्णांमध्ये प्रचंड नाराजगी. ( Yavalnews )

आरोपीला ताब्यात घेण्यासाठी कामरगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश बडतकार व पोलीस कर्मचारी रवाना झालेत. म 45 हजार रुपये किमतीचे 10 रुपयाचे शिक्के, 15 हजार रुपयाच्या 50 रुपयांच्या नवीन करकरीत नोटा आणि म उर्वरित दहा व वीस रुपयांच्या नोटा असे तब्बल एक लाख दहा हजार रुपये व चोरट्यांनी लंपास केले होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

vashimnews:आरोपीला म ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केल्या जाईल. आणि त्यातून व कामरगावातील आणखी काही चोरीत त्याचा समावेश आहे का हे स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment