प्रमोद सावळे, मंगरुळपीर प्रतिनिधी
वनोजा परिसरात निसर्गाची किमया पहायला मिळत आहे. दुर्मिळ पिवळ्या पळसाचे अस्तित्व असलेल्या वनोजा येथून च जवळ असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये दुर्मिळ असलेला सोनसावर देखील फुलला आहे.
वनोजा येथील च पर्यावरणप्रेमी युवकांनी याचा शोध लावला आहे.याला मराठी मध्ये गणेर ( Yellow silk cotton tree) असे म्हणतात.हा मध्यम आकाराचा असून पानझडी या प्रकारामध्ये मोडतो.
हा वृक्ष भारतात मर्यादित भागात च आढळतो. जानेवारी महिन्यातील या वृक्षाची पानगळ होऊन फेब्रुवारी महिन्यात याला मोठी सोनेरी पिवळ्या रंगांची फुल येतात.
महाशिवरात्री का साजरी करतात, जाणून घ्या यामागील खरं सत्य ( mahashivratri )
हा वृक्ष फक्त डोंगरावर वाढणारा असून त्याची रोपे तयार करायची असल्यास ते सहजासहजी तयार होत नाहीत.हा वृक्ष अतिशय उपयुक्त असा आहे इंग्रजी मध्ये याला टॉर्च ट्री असे म्हणतात कारण त्याची वाळलेली लाकडे भुरुभुरू जळतात व खुप वेळ जळतच राहतात.Yellow silk cotton tree
या वृक्षाच्या फांद्यामध्ये विशिष्ठ प्रकारचे तेल असते म्हणून याचा वापर रात्रीची जंगलात भटकंती करताना मशाली म्हणून पूर्वी च्या काळी केल्या जात असे.याचे फळ हे वांग्याच्या आकाराची असून व जांभळ्या रंगाची असतात.फळे पक्व झाल्यावर फळांना करडा रंग प्राप्त होतो.
या फळांमध्ये असलेला कापुस खुप मुलायम व क्रीम रंगाचा असतो. साध्या व काटेसावरा च्या कापसापेक्षा देखील हा सोनसावराचा कापुस मुलायम असतो.या वृक्षाला धार्मिक महत्त्व देखील असून श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणात आढळतो.या वृक्षाला डिंकाला कथल्या गोंद असे म्हणतात हा डिंक सुद्ध औषधी उपयोगाचा आहे.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या सोबतच याची साल व पाने देखील औषधी गुणधर्मयुक्त अशी आहेत.यांच्या सालिमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे यापासून दोरखंड तयार करतात.असा हा सोनसावर वृक्ष वनोजा येथील पर्यावरणप्रेमी आदित्य इंगोले,प्रविण गावंडे,सौरव इंगोले,शुभम हेकड दूर डोंगरावर दिसून आला. निष्पर्ण सागच्या जंगलात दुरून पिवळे सोनेरी फुले अक्षरशः नयनतृप्त करीत होते. वाशिम जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच नोंद असावी.
Yellow silk cotton tree:या आधी सुद्धा वनोजा येथे असलेला दुर्मिळ पिवळा पळस देखील याच युवकांनी शोधुन त्याला प्रकाशझोतात आणले. पिवळ्या पळसाच्या संवर्धनासाठी हे युवक गेल्या 3 वर्षापासून वनविभागासोबत झटत आहेत.त्यांनी कारंजा येथे पिवळ्या पळसाचे शेकडो रोपे तयार केली आहे.या सोनसावर वृक्षाच्या संवर्धनाचा त्यांचा मानस आहे.