नजर वाढवण्यासाठी तुमच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, होतील डोळ्यांच्या समस्या होतील दूर ( Health Eyescare )

 

चष्मीश लोकांना आपल्या चष्म्याचा कितीही कंटाळा

Eyescare तरी देखील त्यांना तो रेग्युलर लावावाच लागतो. जर तुम्हांला तुमच्या डोळ्यांना अंधुक दिसत आहे, असे वाटत असेल तर किंवा खाज, जळजळ होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की,तुमचे डोळे कमकुवत होत आहेत.

यांपैकी कोणती लक्षणे तुम्हांला जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करून आपल्या आहारात नक्की बदल करून घ्याला हवे.

परंतु खरं तर असा कोणताही आहार नाही, ज्यामुळे दृष्टी सुधारेल. योग्य पोषक तत्वांनी आवश्यक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे वाढत्या वयात मोतीबिंदू यासारखे धोकादायक आजार होण्याची शक्यता असते.

चुकूनही फळे व भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नका, अन्यथा भोगावे लागतील त्याचे दुष्परिणाम ( health)

डोळ्यांच्या कमकुवतपणाची कारणे आणि लक्षणे :
डोळ्यांच्या कमकुवतपणाची अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये थकवा येणे, वय वाढणे, चुकीचे खाणेपिणे आणि डोळ्यांशी संबधीत समस्यांचा समावेश आहे.

अंधुक दिसणे हे, डोळ्यांच्या कमकुवतपणाचे मुख्य लक्षण आहे. डोळ्यांची जळजळ होणे, खाज येणे ही कमकुवतपणाची लक्षणे आहेत.

यामुळे डोळे लाल होणे आणि डोळ्यांमधून पाणी येणे. थोड्या थोड्या वेळाने डोळ्यांना थकवा येतो. डोकेदुखी हे डोळ्यांच्या कमकुवतपणाचे खूप मोठे कारण ठरते. विशेषकरून आपण जेव्हा संगणकाचा वापर करतो.

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ओमेगा -3 फॅटी एसिडस् हे खूप फायदेशीर ठरते. म्हणून तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी एसिड्युक्त पदार्थांचा समावेश असावा. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास खूप मदत होते.
आंबट फळे :संत्री, लिंबू, द्राक्षे यांसारख्या फळांमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे एंटी ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे नुकसान होत नाही.

Health Eyescare:यासाठी आहारात फळांच्या ज्यूसचा समावेश करणे गरजेचे आहे.गाजर : गाजरात बीटा कॅरोटिन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला व्हिटामिन ए मिळते. त्याच्या सेवनाने रात्रीच्या वेळी डोळ्यांची पाहण्याची क्षमता सुधारते आणि त्यांचा बाहेरचा पोर्शन सुद्धा चांगला राहतो.

Leave a Comment