बोराखेडी पोलिसांनी दहा दिवस टाळले, मात्र अखेर गुन्हे दाखल केले!आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध जमिनीच्या ताब्याप्रकरणी गुन्हा दाखल; ( sanjaygaikwad )

 

न्यायालयाच्या दणक्याने बोराखेडी पोलिस नमले

बुलढाणा: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध एका महिलेची शेतजमीन हडपून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बोराखेडी पोलिसांनी तब्बल 10 दिवस उशिरा का होईना ही कार्यवाही केली आहे. यामुळे कायद्यापुढे सर्व समान हे सिद्ध झाले आहे.

यापूर्वी मोताळा न्यायालयाने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी, आमदार संजय गायकवाड, त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणि अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते .

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने वाताहत झालेल्या कुटुंबांना वन बुलडाणा मिशनच्या वतीने किराणा किटचे वाटप!( Buldhananews )

Sanjaygaikwad:मात्र बोराखेडी पोलीसानी टाळाटाळ केली. रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय (नागपूर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. फिर्यादीनुसार, राजूर ( ता मोताळा, जिल्हा बुलढाणा) गावात त्यांची दीड एकर शेती आहे.

आमदार गायकवाड यांनी २१ जुलै २०२१ रोजी या जमिनीवर अतिक्रमण केले. तेथे त्यांनी अवैधरीत्या फार्म हाऊस बांधले. फिर्यादीने आक्षेप घेतला असता त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

दररोज रिकाम्या पोटी करा या गोष्टींचे सेवन, आरोग्याला होतील कित्येक फायदे ( healthytips

यावर त्यांनी मागील १२ ऑगस्ट २०२१ रोजी बोरखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.

Sanjaygaikwad: त्यामुळे त्यांनी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या अनु.१५६ (३) नुसार कारवाईचे आदेश १७ फेब्रुवारी रोजी दिले.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली.

Sanjaygaikwad :यामुळे अखेर १४३,१५०, ,३७९,३८५, ४४७, ३४ नुसार आमदार संजय गायकवाड, मृत्युंजय संजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे, ज्ञानेश्वर वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment