क-हेवडगांवमध्ये भगवे वादळ ; डोळ्याचे पारणे फेडणारा ऐतिहासिक शिवजयंती उत्सव सोहळा ( shivjayanti )

 

आष्टी (प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील क-हेवडगांव येथे भव्य दिव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या थाटात संपन्न झाली,

गावातून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे पोशाख परिधान करून विद्यार्थासह हालगी पथक, लेझिम पथक, टाळ मृदंगाच्या गजरात शाही मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत शालेयविद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणांनी क-हेवडगांव शिवमय झाले होते.

घराघरात ठिकठिकाणी दिमाखात फडकणारे भगवे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजी’ अशा कणखर घोषणांनी दाहीदिशा दुमदुमत होत्या.

आईजवळ चुगल्या का केल्या असे म्हणून शिविगाळ, डोक्यात काठी मारून केले जखमी , गुन्हा दाखल ( crimenews )

तालुक्यातील क-हेवडगांव येथे छत्रपतीशिवाजी महाराज यांची जयंती अभुतपुर्व जल्लोष उत्साहात साजरी झाली भगवे झेंडे, आणि भगव्या पताकांनी गाव सजवला होता. शिवरायांच्या गितांचा आवाज दाहीदिशात घुमत होता.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अभूतपूर्व मिरवणूक निघाली शिवकालीन पोशाखात जि.प.प्रा. शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले सायं ४ वाजता महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली शिवमय वातावरणात महाराजांची आरती करून मिरवणूक संपली ६ ते ८ या वेळेत उत्सव समितीच्या वतीने ग्रामस्थांना महाप्रसाद भोजन ठेवण्यात आले होते .

shivjayanti:शिवचरित्रकार ह.भ.प दिपालीताई खिळे महाराज यांचे सुंदर किर्तन झाले. गावातील आजी माजी सरपंच, सदस्य, राजकीय, सामाजिक शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील नागरीकांसह तरुण, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

Leave a Comment