इस्माईल शेखबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव : विश्व हिंदू परिषद च्या तालुकाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या गो तस्करांना अटक करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केला आहे याबाबत गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
की संत नगरी असलेल्या शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी अवैध गोवंश वाहतुक होत असल्याची माहिती शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनेच्या गौरक्षकांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे गौरक्षकांनी संशयित वाहन थांबविले यावेळी गोतस्करांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदचे प्रखंड (तालुका) अध्यक्ष विजय राठी यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला असता.
त्यांच्यावर काही मुस्लिम युवकांनी अचानक हल्ला केला यामध्ये विजय राठी यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे राखी यांना रुग्णालयात दाखल करण्यात हल्ला करणाऱ्या अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद आहे की दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी गाडी क्र. एम. ०४ एफ.यु. ५५३५ मध्ये स्थानीक छत्रपती शिवाजी महाराज चौकात ५ गोवंश निर्दयतेने कोंबलेले आढळून आले. त्याची माहिती शहर पो.स्टे. ला दिली.
असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ते वाहन पो.स्टे. ला लावन्याचे सांगितले परंतु त्याच वेळेस तेथे जमलेल्या ५० ते १०० मुस्लिमांनी ते वाहन पो.स्टे. ला नेण्यास नकार दिला व पोलीसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम समुदयातील काही युवकांनी शिवीगाळ व धक्का बुक्की करण्यास सुरुवात केली. यामध्ये विश्व हिंदू परिषदचे प्रखंड (तालुका) अध्यक्ष विजय राठी यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला असता. त्यांच्यावर काही मुस्लिम युवकांनी अचानक हल्ला केला यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली.
आ. लता ताई सोनवणे यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांची कामाची भूमिपूजन (mla lata sonawane )
असे प्रकार शहरात यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असुन. असेच घडत राहिल्यास शहरात एखादी मोठी अप्रिय घटना घडु शकते व त्यातुन शहराचे सामाजिक सौहार्दास तडा बसुन शहरात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकते. संघटनेने यापूर्वी सुद्धा वारंवार पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयास निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही होतांना दिसुन येत नाही. या निवेदनाच्या माध्यमातुन आम्ही आपणास विनंती करतो की, सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी.
crimenews: सदर विषयाकडे आपण वैयक्तीक लक्ष देऊन शहरात व जिल्हात वाढलेल्या गौतस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावा. तसेच राज्यात गौवशं हत्या प्रतिबंधक कायदा २०१५ ची अमलबजावणी करावी. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गोस्क्वॉडची निर्मिती करावी. तसेच तालुक्याच्या ठिकाणी पशु वैद्यकिय अॅम्ब्युलेंस द्यावी. अन्यथा यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हाभर अधिक तिव्र आंदोलन उभ करण्यात येईल.असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.