बुलढाणा: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने आपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे हे आज मुंबईकडे रवाना झाले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त येताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बुलढाण्याचा दौरा स्थगित केला.
ते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, ना. अंबादास दानवे, वरुण सरदेसाई या सहकाऱ्यासह संभाजीनगर कडे रवाना झाले. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंनी काल गुरुवारी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे जनसंवाद सभा घेतल्या.
रात्री ते शेगाव मध्ये मुक्कामाला होते.
आज २३ फेब्रुवारीला सकाळी पक्ष प्रमुखांनी गजानन महाराज संस्थान मंदिरातील समाधी स्थळाचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
वनविभागाच्या कारवाईत अखेर ५ लाखांचे सागवान जप्त; वनविभाच्या ही मोठी कारवाई ( forestnews )
दरम्यान त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत खासदार, विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दौरा स्थगित झाल्याने आजच्या खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा येथील सभा रद्ध झाल्या.
मनोहर जोशी कडवट शिवसैनिक : ठाकरे
दरम्यान मुंबईला रवाना होण्यापूर्वी ठाकरे यांनी माध्यमाशी संवाद साधला. मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष यापेक्षा त्यांचे निष्ठावान सैनिक असणे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
पक्षाच्या संकटाच्या काळात देखील ते एकनिष्ठपणे शिवसेने सोबतच राहिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या, मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांनी शिवसेना वाढविण्यासाठी तहहयात मेहनत घेतली. त्यांची प्रेरणा घेऊनच सध्याच्या कठीण काळात शिवसेना पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत आहे.
uddhav thackeray : या शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय जोशींना श्रद्धांजली अर्पण केली.