forest news:अधिकारी कर्मचाऱ्यांवर दोष सिद्ध झाल्यावरही कारवाई नाही.
वन मजूर, कर्मचारी नियमबाह्य एकाच ठिकाणी कार्यरत.
वन विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर..
श्रीमती गवस यांचे पंधरा दिवसात मागण्याची पूर्तता करन्याचे आश्वासन..
उपवनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोकन्याचा आझाद हिंदचा ईशारा.
बुलढाणा:
forest news: वन जमीन आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण झाले पाहिजे. बिबट्यांची शिकार झाल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी तरी चौकशी नेमण्यात आली नाही.
तू मला आवडते असे सांगून दिरानेच केला वहिनीचा विनयभंग.. आरोपी दिराविरुद्ध गुन्हा दाखल..(crimenews)
अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच वन्यजीव पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलातून बाहेर येत आहे. मागील तीन वर्षात दोषी सिद्ध झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. वन मजूर व कर्मचारी अनेक वर्षापेक्षाही जास्त कालावधी एकाच ठिकाणी. रिटायर्ड अधिकारी, कर्मचारी आजही कार्यरत आहेत.
शासनाच्या करोडोच्या निधीचा अपव्यव्हार झाल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. वन जमिनीवर दैनंदीन अतिक्रमण वाढत आहे. वन्य प्राण्यांची शिकार, हत्येच्या गंभीर घटना दैनंदिन समोर येत आहेत.
यासह प्रमुख मागण्यांच्या पृर्ततेचे निवेदन देत दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.अन्यथा उपवनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशारा आझाद हिंद संघटनेच्या वतीने तक्रार निवेदनातून देण्यात आला आहे.
लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत वनसचिव मंत्रालय,मूंबई यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनबल संरक्षक नागपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी अमरावती, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्यासह संबंधितांना देण्यात आले आहे.उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुराव्यानिशी निवेदन देण्यात आले.
forest news: यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे,असलम शाह,शेख सईद,लियाकत खान, संजय एंडोले,सूरेखा निकाळजे,वर्षा ताथरकर, पंचफुलाबाई गवई, आशा गायकवाड,मोहम्मद रसूल,गुलाब शाह, राजेंद्र ससाने, मेहमूद शाह,रशीद शाह, कुर्बान शाह, यासह आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.