मागील वर्षी आलेल्या महापुराच्या संकटकाळी पत्रकाराने सहकार्य केल्याबद्दल सत्कार..
अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक ) 8975551991
journalist: संग्रामपूर तालुक्यातील मौजे उकडगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार शेख कदीर यांचा सत्कार करण्यात आला.
उकडगाव येथील शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय उर्फ राजूभाऊ दही यांनी शेख कदीर यांना शाल व श्रीफळ देऊन गावाचे वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महादेव अजणे यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांनी सांगितले की पत्रकार शेख कदीर हे उकडगाव च्या विकास कामासाठी सदैव प्रयत्न करत असतात मागील वर्षी या गावात महापूर आला होता.
त्यावेळेस प्रत्यक्ष गावात येऊन त्यांनी गावकऱ्यांना सहकार्य केले त्यामुळे संपूर्ण गावाचे वतीने गावाचे त्यांचा सत्कार करण्यात आला.
journalist:- याप्रसंगी गावातील मुन्ना गायकवाड सोपान पाटील गणेशराव गोमासे ग्रामपंचायत सदस्य सौ प्रज्ञाताई दामोदर देवानंद अजणे व बापूराव दामोदर सौरभ कडाळे दीपक दामोदर बाळू पिंपळकर विशाल बांदरकर बबलू कडाळे अभिषेक भिसे अनिकेत भिसे बहुसंख्या ग्रामस्थ या सत्कार समारंभात उपस्थित होते