SBI ATM| सर्वसामान्य माणसाला विचारात पाडणारी घटना संग्रामपूर तालुक्यात घडली असून आता जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा आणि आपण सुरक्षित आहोत की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे ,
ज्या प्रमाणे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अश्यात आव्हानात्मक चोरी करत ATM गायब करणाऱ्या चोरांनी संग्रामपूर पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे ,
त्यामुळे खरोखर ह्या घटनांचा बंदोबस्त करून गुन्हेगारांना संग्रामपूर पोलीस कशे वठणीवर अनातात याकडे आता लक्ष आहे , नाहीतर सर्वसामान्य जनतेतील विश्वास संपून जाईल असे म्हटले तर चुकीचे नाही , त्यामुळे दबंग कारवाही करून गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्याचे आव्हाहन आता संग्रामपूर पोलिसांसमोर असून त्यांनी ताबडतोब शोध मोहीम हाती घेऊन घटनेचा छळा लावणे गरजेचे आहे.
संग्रामपूर येथील चोरीच्या घटनेत चोरटे अति हुशार आहेत. त्यांना माहित होतं की,तामगाव आणि सोनाळा या दोन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त बावनबिरच्या कार्यक्रमात आहे. म्हणून त्यांनी अख्खी एटीएम मशीनच उचलून नेली…!
तामगाव तत्कालीन ठाणेदार गावंडे यांच्या कारकीर्दीत चोरट्यांनी आवाहन केलं होतं. पण आता मात्र महत्त्वाचं असलेल्या तहसील विभाग “ट्रेझरीत” झालेली चोरी ची घटना… आता पर्यंत तपास लागलं नाही परंतु हे सर्वांना चांगले प्रकारे माहित आहे.. परंतु संग्रामपूर येथे रात्री म्हणजे पहाटे दरम्यान झालेली ही मोठी चोरी असून
SBI ATM : या चोरट्यानी तर चोरी करून चक्क पोलिसांना , आवाहन केलं एवढे मात्र खरं.. वृत्त लिह पर्यंत स्थानिक घटनेची काहीच कारवाई झाली नाही. पुढच्या तपास तामगाव पोलीस करत आहे.