Akolanews | शिव सेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयी बाबत विभागीय रेल्वे प्रबंधकांशी बोलून सोडविल्या समस्या..

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर हे प्रामुख्याचे स्थानक असून या मुर्तीजापुर रेल्वे स्थानकास जंक्शन चा दर्जा असून या रेल्वे स्थानकावरून नित्याने हजारो प्रवासी प्रवास करतात.


या रेल्वे स्थानकापासून जवळच कारंजा लाड येथे प्रसिद्ध असे श्रीक्षेत्र दत्ताचे गुरु मंदिर, बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर आदी असे छोटे मोठे 165 गावे असल्याने येथे दररोज मुंबई, पुणे, नागपूर व गुजरात येथून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ कायम असते.

Savitribai Phule | महात्मा फुले उत्सव समीती शेगांव द्वारे क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मात्र मुर्तीजापुर रेल्वे स्थानकास जंक्शन चा दर्जा असल्यावरही कित्येक वर्षापासून कोच इंडिकेटर, स्थानकाबाहेर शौचालय, दोन्ही फलाटावर उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात थांबण्याकरिता शेड नसल्याने येथील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांना लक्षात येताच ,

त्यांनी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्याकरिता आले असलेल्या व नव्याने रुजू झालेल्या भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक श्रीमती…… पांडेय यांना एका निवेदनाद्वारे प्रवाशांच्या समस्यांची जाणीव करून दिली व चर्चेतून निदर्शनात समस्या आणून दिली व आव्हान केलेत्या त्वरित समस्या सोडवण्याचे आव्हानही केले होते.

त्यांच्या या मागणीला विभागीय रेल्वे प्रबंधक व रेल्वे प्रशासनाने सकारात्मक उत्तर देत विभागीय रेल्वे प्रबंधकांनी लवकरात लवकर आपल्या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते.

Akolanews :शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांच्या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावर त्वरित कोच इंडिकेटर, शौचालय, दोन्ही फलाटवर शेड बांधकामाचे कार्यास सुरुवात केल्याने शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी रेल्वे प्रशासनाचे व विभागीय रेल्वे प्रबंधक भुसावळ यांचे आभार मानले.

असे शिवसेना शिंदे गटाचे प्रसिद्धी प्रमुख व तालुका सोशल मीडिया प्रमुख प्रतीक कुऱ्हेकर यांनी हे का परिपत्रकाद्वारे कळविले.

Leave a Comment