गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत “दिव्यांग विद्यार्थ्यांसांठी समता सप्ताह” कार्यक्रम उत्साहात संपन्न.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-समग्र शिक्षा जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व गट साधन केंद्र चामोर्शीच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसांठी गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने जिल्हा परिषद नुतन शाळा चामोर्शी येथे शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचारी यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या पर्वावर दिनांक ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत समता सप्ताह कार्यक्रम साजरा करावयाचे असल्याने विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी व पालकांसाठी जनजागृती करण्यासाठी चामोर्शी शहरात प्रभातफेरी काढण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याची समान संधी, मानवी अधिकारात समान दृष्ट, भेदभाव विरहित वातावरण आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी खेळीमेळीच्या वातावरणातून प्रेरणादायी ठरावे यासाठी परिसंवाद,चर्चासत्र,रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची,क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र चामोर्शीचे गट समन्वयक चांगदेव सोरते, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नगराळे,सहायक शिक्षक प्रभाकर गजभिये,विजुधर मडावी, श्रीमती उराडे, विषय साधनव्यक्ती घनश्याम वांढरे, विवेक केमेकर, विशेषतज्ञ सुशिल गजघाटे,विशेष शिक्षक श्रीमती मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण,दशरथ गहाणे,रवी खेवले,जीवन शेट्टे,उमेश पोहाणे,हिमदेव पिपरे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Comment