बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या धामणगाव जवळील पान्हेरा येथे बेलदार समाजाच्या कानू सती माता यात्रेला सुरूवात झाली. या यात्रोत जळगाव (खान्देश) येथील आनंद लोकनाट्य तमाशा मंडळचे पथक मनोरंजनासाठी दाखल झाले होते.
या मंडळाच मंडप उभारताला लोखंडी रॉडचा विजेच्या तारांवर पडल्याने दोन कामागारांचा मृत्यू झाल तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे.
पान्हेरा गावातील कानू सती मातेच्या दर्शनावेळी तमाशा आनंद लोकनाट्य मंडळाच्या मनोरंजनासाठी पिंडल उभारताना लोखंडी पाईपच्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने नाट्य मंडळात काम करणाऱ्या दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.
यात अंकुश वायाळ रा. नारायणगाव ता. सिन्नर जि. पुणे आणि विशाल गणेश भोसले, रा.जेजूर गणपती ता. भोकरदन यांचा यांचा जागवेरच मृत्यू झाला. तर राहुल शंकर जाधव, रा.मुंबई हा गंभीर जखमी झाला.
https://www.suryamarathinews.com/crimenews-3/
घटनेनंतर तिघांनाही धामणगाव बधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाची प्रकृती चिंताजनक होती.