इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांना जनसेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय नारीशक्ती रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत जनसेवा फाउंडेशन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ रजनी आशिष आचार्य यांनी माधुरी शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
की राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी मदत करणे, महिलांना आत्मनिर्भर बनविणे, महिलांचे रक्तदान शिबिर आयोजित करणे, जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी महिलांसाठी रोगनिदान शिबिर आयोजित करणे, आदिवासी महिला व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीचा फराळ वाटप करणे.
तसेच त्यांना नवीन कपड्याचे वितरण करणे, वृक्षारोपण ,रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम माधुरी शर्मा यांनी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या माध्यमातून यशस्वीरित्या आयोजित केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई येथील जनसेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय नारीशक्ती रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला.
लवकरच एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती जनसेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ रजनी आशिष आचार्य यांनी पत्रामध्ये दिली आहे.