इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव दिव्यांगांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट होणे काळाची गरज असे मत प्रहार अपंग क्रांतीच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई गीते यांनी व्यक्त केले.
शेगांव तालुका व शहराच्या वतीने आयोजित प्रहार अपंग क्रांती दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व गरजू दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका वाटप कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे शहर अध्यक्ष स्व. अभय पवार दादा यांना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा सचिव किशोर माहोकार दिव्यांग मार्गदर्शक श्री. नानाराव इंगळे साहेब, सावली ग्रुपचे संचालक प्रशांत कराळे सर,दिव्यांग सेवक दत्ताभाऊ महाले, शेगांव तालुका अध्यक्ष राजेश दांदडे, शेगांव शहर अध्यक्ष शेख आरिफ, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेगांव तालुका अध्यक्ष राजेश दांदळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेगांव प्रहार अपंग क्रांतीचे तालुका व शहर पदाधिकारी आणि अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. मागील ६ महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्था करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. या कार्यक्रमां मध्ये ६० गरजू लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिका प्रहार अपंग क्रांतीच्या पाठपुराव्यांनी वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा ताले यांनी केले. तर आभार प्रदर्शन शेगांव शहर अध्यक्ष शेख आरिफ यांनी मानले. अशी माहिती प्रहार अपंग क्रांतीचे शेगाव तालुका अध्यक्ष राजेश दांदडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाला दिली. Shegaon