मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण
वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!
संग्रामपूर ः- तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र वन्यजीव प्रादेशिक मधील वसाळी बंदर झीरा वनरक्षक स्वतःची बीट सोडून दुसऱ्या तालुक्यातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्र हद्दीत येऊन रंदा मशीनचे दुकानावर बसून जामोदला बैठक घेऊन स्वतःचा चांगभलं करून घेण्यासाठी देवाण-घेवाण तर करीत नाही ना ?
अशी चर्चा जनतेत सुरू आहे, याकडे वरीष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे समजते.
सदर मिथुन गवळी नामक वनरक्षक हा स्वतःची बीट सोडून दुसऱ्या वनपरिक्षेत्रातील हद्दीत का येतो ?
याबाबत वरीष्ठांची परवानगी घेतल्या जाते काय? याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. यावर संबंधित वनरक्षकावर काय कारवाई होणार?
व होणार की नाही? नाहीतर “तेरी भी चुप मेरी भी चूप” असे होणार का ?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सदर वनरक्षकावर कारवाई ही अपेक्षा आहे. #vanvibhag #forest