नवभारत साक्षरता कार्यक्रमातून “सर्वांसाठी शिक्षण” असाक्षरांसाठी ठरणार आशेचा किरण….!

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-दिनांक ४,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य पुणे,शिक्षण संचालनालय(योजना)पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ४ आक्टोबर २०२३ ते दिनांक ६ आक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू असलेले नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुका सुलभकांचे “जिल्हा स्तरीय प्रशिक्षण” हे अतिशय उत्साहात आणि आनंदात कमलताई मुनघाटे हायस्कूल गडचिरोलीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी प्राथमिक विवेक नाकाडे जिल्हा परिषद गडचिरोली,शाळेचे प्राचार्य सागर मशाखेत्री हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणाला मुख्य सुलभक म्हणून अधिव्याख्याता पुनीत मातकर,विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,विनायक लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 36 प्रशिक्षणार्थींना कृतीयुक्त गटपद्धतीने,भुमिकाभिनय,आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे सुरू आहे.

प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०,निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान,उजास प्रवेशिका भाग एक ते चार मधील घटक,उल्लास ॲप्स, स्वयंसेवक मार्गदर्शिका, स्वयंसेवकांची भूमिका,कुटुंब आणि शेजार,संवाद,आपली संस्कृती,आपल्या अवतीभवती, आहार आणि आरोग्य,मतदान, कायदेविषयक माहिती,आपत्तीचे प्रकार व स्वरूप,काळानुरूप बदलत्या गोष्टी,प्रवास,मनोरंजन,वित्तीय साक्षरता व डिजिटल साक्षरता या थीमच्या माध्यमातून अधिव्याख्याता पुनीत मातकर, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,विनायक लिंगायत यांच्या सुलभनातून प्रशिक्षण दिल्या जात आहे.

प्रशिक्षणाला सर्व प्रशिक्षणार्थी अतिशय उत्साहाने,हिरीरीने व सकारात्मक दृष्टीने सहभागी होऊन प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सहकार्य करीत आहेत.प्रशिक्षणात तालुकास्तर केंद्र स्तर आणि शाळा स्तर प्रशिक्षणाचे नियोजन दिल्या जात आहे.

सोबतच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले,शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांच्या नियंत्रणात प्रशिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे.

Leave a Comment