सुटाळा बू. येथे आ.आकाशदादा फुंडकर यांच्याहस्ते सुटाळा बु येथे विकास कामांचे भूमिपूजन

 

विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.ad. आमदार आकाश दादा फुंडकर

रत्नाताई डिक्कर खामगाव प्रतिनिधी

खामगाव:सुटाळा बू येथे 1कोटी 13 लक्ष रू. खर्चाच्या विकास कामांचा उद्घाटन कार्यक्रम आमदार एडवोकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते दि. 24/9/2023रविवारी घेण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच सौ. वर्षा ताई दिनेश इंगळे उपस्थित होते. तर उद्घाटक आमदार एडवोकेट आकाश दादा फुंडकर हे होते .

प्रमुख उपस्थिती मध्ये उपसरपंच नारायण भाऊ पाटील भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ गव्हाळ, ग्राम.पंचायत सदस्य पुंडलिक राव वानखडे ,रामेश्वर भाऊ दुतोंडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. कोर्ट कॉलोनी येथील माळी समाज सभागृह , तसेच संरक्षण भिंत या 80 लक्ष रू. कामाचे सरपंच सौ. वर्षाताई इंगळे , तसेच .

आमदार आकाश दादा फुंडकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरदचंद्र गायकी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवरावजी मानकर यांनी विकास कामाबद्दल माहिती सांगितली. ग्रापं सदस्य पुंडलिकराव वान खडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये

ad. आकाश दादा फुंडकर यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांचे सुटाळा bu. गावाच्या व ग्रां प. च्या वतीने आभार मानले. उद्घाटनपर भाषणात आमदार आकाश दादा फुंडकर यांनी सुटाळा bu. येथे निधीची कमतरता पडू देणार नाही. तसेच गावातील कोणतेही नागरिक समस्या घेऊन आले तर समस्या दूर करू तसेच एमआयडीसी मध्ये ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी गेल्या त्यांना ताबडतोब एक ते दीड महिन्याच्या आत जमिनीचा मोबदला देऊ अशी ग्वाही दिली. तसेच लवकरच 22 कोटी रु.खर्चाच्या पाणीपुरवठा पाइप लाइनचे भूमिपूजन करण्यात येईल असे सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष गजानन राऊत, माळी सेवा मंडळ खामगाव, वधुवर परिचय संमेलन , संत सेना महाराज मंडळ, सुटाळा bu. ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, ग्राम.सदस्य.गणेश उत्सव मंडळ कोर्ट कॉलोनी ,जय महाराष्ट्र कामगार ग्रुप या सर्व मंडळींनी आकाश दादा यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदीप भाऊ सातव यांनी केले. तर आभार प्रदर्शन एकनाथ इंगळे यांनी केले.

Leave a Comment