शेगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छतेवर आधारित लघु नाटिका सादर

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशाने शेगाव रेल्वे स्थानक येथे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिलांनी स्वच्छतेवर आधारित लघु नाटिका सादर केली.

देश विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थळ असलेल्या संत शिरोमणी श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भुसावळ डिव्हिजन मधील मध्य रेल्वेच्या शेगाव रेल्वे स्टेशन हे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या स्वच्छता पंधरवडा निमित्त शेगाव रेल्वे स्टेशन येथे शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव रेल्वे स्थानक वरील स्वास्थ निरीक्षक लाभिने किशोर पाटील रेल्वे सुरक्षा बलाचे रणवीर सिंग श्रीवास्तव साहेब डॉक्टर विजय साळवे मुख्य आरक्षक रंजन तेलंग संजय पावती मुख्य तिकीट निरीक्षक मुख्य बुकिंग पर्यवेक्षक तळवी साहेब,

शेगाव रेल्वे स्टेशनचे परिवहन निरीक्षक पी एम पुंडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रणिता धामंदे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हा सचिव मंदाकिनी चव्हाण, संघटक अलका बांगर, शेगाव तालुकाध्यक्ष सौ शुद्धमती निखाडे, सौ मंगला सोळंके खामगाव शहर अध्यक्ष सौ रंजना चव्हाण राठोड सौ सुनिता ढोले दीपमाला कांबळे कुमारी कुसुम चौहाण, राष्ट्रीय महिला बस प्रवासी संघटनेच्या शेगाव तालुकाध्यक्ष कुमारी धनश्री बडे आदी महिलांनी स्वच्छतेवर आधारित लघु नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली

Leave a Comment