इस्माईल शेख.बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव आगामी श्री गणेश विसर्जनासह इतर सण उत्सवाच्यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने
समाजातील उपद्रवी घटकांना पोलीस दल सतर्क, एकसंध व
शक्तीशाली असल्याची प्रत्यक्षरित्या जाणीवकरूनदेण्याकरितारूटमार्च काढण्यात येतो.
पोलीस स्टेशन येथून सुरू करण्यात आलेला हा रूट मार्च महाराजा अग्रसेन चौक, छ. शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, लहुजी वस्ताद चौक, शितला माता मंदिर, फरशी मशीद, इक्बाल चौक, शिवनेरी चौक, भगतसिंग चौक व परत छ. शिवाजी महाराज चौकातून पोलीस स्टेशनमध्ये सांगता करण्यात आली.
या रूटमार्चमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, ठाणेदार सुनिल अंबुलकर, ग्रामीण पोस्टे ठाणेदार दिलीप वडगांवकर, ११ अधिकारी, ९९ कर्मचारी, ४० होमगार्ड यांच्यासह आरसीबी पथकातील २०० ते २५० जवानांचासमावेश होता.
|