जलंब सरपंचांनी कमिशनरूपी भ्रष्टाचाराच्या पैशातून केलेल्या कामाची चौकशी करावी.

 

स्वाभिमानीचे गिरधर देशमुख यांची पं. स. कडे मागणी

खामगाव: शेगाव तालुक्यातील जलंब येथील माजी सरपंच सौ. मंगला उत्तम घोपे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे अडीच कोटीची विकास कामे केली. या कामाच्या मध्यमातून
मिळालेल्या २२ लाख ७७ हजाराच्या भ्रष्ट्राचार रुपी कमिशन मधून विकास कामे केल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी,

अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर दलपतराव देशमुख, यांनी शेगाव पं. स. गट विकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माजी सरपंच यांनी १८ मे २०२३ रोजी विकास कामांचा आढावा सादर करण्याबाबत घेतलेल्या एका कार्यक्रमात वरील प्रमाणे भ्रष्टाचाराची स्पष्ट कबुली दिली आहे.

यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतांना सुद्धा याप्रकरणी काहीच कार्यवाही झालेली नाही. यावरून सदर भ्रष्टाचाराला प्रशासनाची मान्यता दिसून येत असल्याचा आरोपही गिरधर देशमुख यांनी केला आहे.

तसेच विविध मुद्दे उपस्थित करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.विशेष बाब म्हणजे यासंदर्भात गिरधर देशमुख यांनी यापूर्वीच ग्रामपंचायत कडे चौकशीची मागणी केली आहे. परंतु दाद मिळाली नाही.

Leave a Comment