यावल तालुका( प्रतिनिधी) :-विकी वानखेडे
यावल तालुक्यातील चुचाळे गायरान येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे गायरानधारकांसाठी 20 जुलै रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वा मध्ये होणाऱ्या मोर्चात जास्तीत जास्त गायरानधारकांनी सहभागी व्हावे
याकरिता वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने याच्या सुचनेनुसार व जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी जाऊन मोर्चा मध्ये येण्याचे आवाहन करतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक राजेंद्र बारी,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, यांनी चुचाळे गायरान भागात राहणारे आदिवासी असलेले गिलदाल रामदास बारेला राकेश बारेला रमेश भाऊलाल बारेला मोहन बारेला सुनील बारेला भारत बारेला त्रीदासिंग बारेला यांची भेट घेऊन मोर्चात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.