इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
अमरावती : श्री शेत्र कारंजा (लाड)जि. वाशिम येथे श्री. नृसिंह सरस्वती (गुरु महाराज) मंदिरात श्रीसंत परशराम महाराज, महिमा ग्रंथाचे पारायण ०९ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक भाविकांनी पारायणासाठी ३० जुनपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन श्री परशराम महाराज सेवाधारी परिवार यांची तर्फे करण्यात आले आहे.
महाराजांनी कारंजा लाड या परिसरामध्ये दिनांक २१ मार्च१९५१ (होळी पौर्णिमेच्या) दिवशी इंझा तालुका कारंजा (लाड) या गावी ब्रह्मलीन झाले त्यानंतर त्या परिसरामध्ये महाराजांचा कुठलाही पारायणाचा कार्यक्रम झालेला नाही.
त्या उद्देशाने सर्व समाज बांधवांनी व भक्तांनी या पारायण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे या हेतूने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज (गुरु महाराज) मंदिराचे विश्वस्त कारंजा (लाड) यांच्या सहकार्याने थेट मंदिर परिसरातील समोरच्या सभागृहात पारायणाची संधी भाविकांना मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी सेवाधारी देविदासजी वाघमारे, जयंत वानखडे, गोकुळभाऊ शेगोकर, भालचंद्र दादापाटील कथलकर, राजूभाऊ काथलकर, प्रशांतभाऊ देशमुख, अध्यक्ष शरद देवरणकर, जयंत पुसतकर, विलास जामठीकर, विलास दलाल, शरद निहाटकर, हरिहर तांबस्कर, संदीप राजूरकर, सचिन आरोकर, राजू धाकतोड,गणेशराव भांडे,सचीनराव चौधरी, दत्ताभाऊ कापसे,दिपक राजनकर,संतोष दुत्तोंडे,अशोक आगरकर, शुभम पुसतकर,ओम मोरे, कैलास डांगे, सुरेश रोहनकर, मोहन पंडित, पुरुषोत्तम खंडार, सौ रंजनाताई डोरस, सौ पद्माताई भारसाकळे, प्रभाकरराव शेगोकर, चंद्रकांत पुसदकर, अंकुश बाळापुरे, विजय खंडार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.