शेगांव शहरातील काही निवडक प्रभागातील नागरिक पाणीपुरवठा नळ योजने पासून वंचित

 

इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी

शेगांव शहरातील काही निवडक प्रभागांमध्ये नव्याने समाविष्ट आलेले वार्ड/प्रभाग मुलभूत गरजांची अभाव आपल्या ला पहायला दिसुन येत आहे आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळुन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

 

असे असतांनाच नव्याने स्थानिक झालेल्या लोकांना भरपूर प्रमाणात कर नगरपरिषद शेगांव कडुन वसुल केला परंतु त्या लोकांना पाणीपुरवठा मिळाला नाही याची दखल सुद्धा कोणीही घेत नाही आपण मोठ्या आनंदात, उत्साहात अमृत महोत्सव वर्ष साजरे करतो

परंतु आपल्या या भारत देशातील शेगांव शहरातील अवस्था बघता नागरिकांना मुलभूत गरजांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे असे असतांनाही येथील आमदार, लोकप्रतिनिधी,जनसेवक स्वताला जलयोधा संबोधित घेणारे येथील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत…….

तात्काळ प्रशासनाने या कडे पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर यांनी केली आहे…..!!

Leave a Comment