खामगाव येथून जलंंब करिता पहाटे सुटणाऱ्या रेल्वेची वेळ बदला- माधुरी शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष रेल्वे महिला प्रवासी संघटना

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: खामगाव रेल्वे स्टेशन येथून पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी जलंब साठी सुटणारी रेल्वे गाडीची वेळ बदलण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने केली आहे याबाबत भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे प्रबंधक डीआरएम यांना रेल्वे स्टेशन उप प्रबंधक संतोष अनासने यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे

की पहाटेची वर्धा येथून भुसावळ कडे जाणारी पॅसेंजर ट्रेन ही जलंंब रेल्वे स्टेशन वर पहाटे पाच वाजता पोहोचते तर दुसरीकडे खामगाव येथून जलंब साठी गाडी क्रमांक 51102 ही तीन डब्याची असलेली ट्रेन पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सोडण्यात येते ही ट्रेन जलंब स्टेशन येथे 5: 05 मिनिटांनी पोहोचते ही ट्रेन पोहोचे पर्यंत वर्धा भुसावळ ही पॅसेंजर गाडी जलंब रेल्वे स्टेशन येथून निघून गेलेली असते

त्यामुळे पहाटे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो किंवा जलंब येथे वर्धा भुसावळ पॅसेंजर गाडी पकडण्यासाठी खाजगी वाहनातून मानसिक शारीरिक त्रास सहन करून जलंंब येथे पोहोचावे लागते. रेल्वे प्रशासनाने खामगाव येथून गाडी संख्या 51102 या गाडीच्या वेळेमध्ये बदल करून या तीन डब्याची गाडी पहाटे 4:50 च्या ऐवजी चार वाजून वीस मिनिटांनी म्हणजेच अर्ध्या तास अगोदर खामगाव येथून जलंब साठी सोडण्यात यावी

जेणेकरून पहाटे पाच वाजताची जलंब येथे येणारी वर्धा भुसावळ पॅसेंजर ही गाडी पकडण्यासाठी खामगाव येथून जलंब साठी जाणारे प्रवाशांना मिळू शकेल व त्याद्वारे रेल्वे विभागालाही या तीन डब्याच्या रेल्वेद्वारे महसूल प्राप्त होईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या माध्यमातून डीआरएम भुसावळ रेल्वे मंडळ यांना स्टेशन उपप्रबंधक संतोष अनासने यांच्या मार्फत पाठविण्यात आले

या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष लीनाताई पाचबोले, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय संघटक रूपाली वानखडे, विभागीय सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष किरण ताई लंगोटे, मंगलाताई सपकाळ, जयश्रीताई देशमुख, आदींच्या सह्या आहेत

Leave a Comment