शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या फरारी व्यापाऱ्याचा तत्काळ शोध घेण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली ओप्पो विभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे साहेब शेगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी ठाणेदार अनिल गोपाळ व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे

की शेगाव शहर व तालुक्यातून अनेक शेतकऱ्याकडून कोट्यवधी रुपयांचा शेतीमाल खरेदी करून पैसे न देताच पळून गेलेल्या मुख्य आरोपी असलेल्या चौधरी नावाच्या मुख्य आरोपीचा पोलीस प्रशासनाने तत्काळ शोध लावून अटक करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडे केली आहे

या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे साहेब यांच्यासह शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांची या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली या चर्चेदरम्यान दस्तूर खुद्द श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा स्वतः ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना फोन करून संपर्क साधला व मुख्य आरोपी असलेल्या व्यापाऱ्याचा शोध घेऊन तत्काळ अटक

करण्याबाबत चर्चा केली 30 मे पर्यंत आरोपीला जर अटक झाली नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या शिष्टमंडळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे शहराध्यक्ष संदेश कुमार शेगोकार ,महासचिव श्रीकांत काठोळे, आशिष शेगोकार जीवन शेगोकार यांच्यासह पीडित शेतकरी दत्तात्रेय हांडे ओम लिंगसे, ऋषिकेश तेल्हारकर, सहदेव हांडे, ए एस धनो कार ,रवींद्र पल्हाडे, वासुदेव विंडो कार, अनिल म्हसणे ऐ पी मसने यांच्यासह अनेक पीडित शेतकरी सहभागी झाले होते

Leave a Comment