यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे
यावल फैजपुर मार्गावरील रस्त्यावर सांगवीहिंगोणा गावाच्या दरम्यान अज्ञात वाहने धडक दिल्याने मोटरसायकलच्या भिषण अपघात झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की भिमराव बाळु पांडव (वय ३५ वर्ष राहणार म्हैसवाडी तालुका यावल ) हा तरूण आपल्याकडील मोटरसायकल क्रमांक एमएच १९ ईबी ४७९१व्दारे सांगवी गावात आपल्या सासरवाडीला भेट देवुन यावल फैजपुर मार्गा वरून सांगवी मार्ग मारूळ गावास आपल्या बहीणीस भेटण्यासाठी दुचाकी वाहनाने जात होता.
दरम्यान, रात्री ८,३० ते ९ वाजे च्या सुमारास सांगवी ते हिंगोणा गावाच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने मोटरसायकला जोरदार धडक दिल्यावे मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात भिमराव पांडव नांवाचा हा जागीच मरण पावले आहे .
अपघात झाल्यावर तात्काळ नागरीकांच्या मदतीने गंभीर जख्मी झालेल्या भिमराव पांडव यास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले. मयत भिमराव प्रदीप पांडव यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन लहान मुली व एक मुलगा आहे.
त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.