शेतकऱ्यांसाठी काम करणारे शेतकरी पुत्र नितीनकुमार पहुरकार यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

 

नाशिक येथील ॲग्रो केअर गृप ऑफ कंपनी (एजीसी) या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय दर्जाच्या ‘नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड-२०२३’ पुरस्काराचे वितरण नाशिक येथील द इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे सिने अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक डॉ.सुर्या गुंजाळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेत्री स्मिता प्रभू ,राहुरी कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त उच्च अधिकारी डॉ. प्रमोद रसाळ, कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन भूषण निकम हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक ॲग्रो केअर गृप ऑफ कंपनीच्या संचालिका रोहिणी पाटिल यांनी केले.
कृषी विस्तार व प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, गटशेती व विषमुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करुन शेकडो शेतकऱ्यांना प्रशिक्षीत करणारे बुलढाणा जिल्ह्यातील नितिनकुमार पहुरकार यांना देण्यात आला.

नितीनकुमार यांनी विवेकानंद कृषी महाविद्यालय येथून ‘कृषी पदवी’ पूर्ण केली. त्यातच वडिलांचे छत्र हरपलेल्या नितिनने शिकवणी वर्ग घेऊन घराची आर्थिक धुरा सांभाळत पुढील शिक्षण मात्र सुरुच ठेवले ‘एमबीए’ मध्ये पदव्युत्तर पदवी आणि कायद्याचे शिक्षण(LLB) देखील घेतले. शासकीय तसेच नामांकित कंपन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणुन कामगीरी बजावली.,

या शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग कृषी व कृषी निगडित प्रश्नांवर करायचा असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतामधून प्रकट केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना YCMOU चे माजी संचालक डॉ. सुर्या गुंजाळ यांनी पुरस्कार्थीचे अभिनंदन करुन त्यांचे कार्यकाळातील अनुभव सांगीतले. मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी विषमुक्त मालाची मोठी मागणी वाढत आहे.कृषी क्षेत्रातील शेतमाल विक्री व्यवसायातून रोजगाराला प्रचंड संधी उपलब्ध आहेत.यामधे युवक वर्गाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच सेंद्रीय शेती काळाची गरज आहे त्यामूळे कॅन्सर सारख्या रोगराईपासून स्वतःला वाचवायचे असेल तर शेतीमधील रसायनांच्या वापराला थांबवावं लागेल आणि पर्यावरणाचा विचार करूनच शेती केली पाहिजे ,असे विचार आपल्या भाषणातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी उच्च अधिकारी डॉ. प्रमोद रसाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी उपस्थित होते. प्राजक्ता पवार यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी “शेतकरयांना असंख्य समस्या आहेत आणि या समस्या रावणाच्या दहा तोंडाप्रमाने कधीच संपनार नाहीत परंतू त्यावर मात करण्यासाठी आपसातील हेवेदावे मागे टाकून समूहशेतीची कास धरने गरजेचे आहे, यातून सेंद्रीय पद्धतींचा वापर करुन उत्पादन खर्चात बचत होईल आणि निव्वळ नफा वाढवता येईल.,गटशेतीमुळे शेतकरी एकत्र निविष्ठा खरेदी,मजुरी खर्च बचत व आपल्या शेतमालाचा भाव करू शतील असे मत नितीनकुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

Leave a Comment