कोल्हापूर वार्ताहर : २० मार्च भारतीय लोकशक्ती पक्ष पक्षप्रमुख कोळप्पा ह.धोत्रे यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर पक्ष वाढीसाठी दौरे चालू आहेत. भारतीय लोकशक्ती पक्ष पक्षप्रमुखांनी कोल्हापूर येथे १९ मार्च रोजी शासकीय विश्रामगृह येथे.
विविध कार्यक्रम कोल्हापूर दौरासाठी आले असताना. २० मार्च रोजी कोल्हापूर सर्किट हाऊस मध्ये. कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय लोकशक्ती पक्ष पदाधिकारी यांना एकत्र बोलावण्यात आले. पक्षाच्या पदाधिकारी बैठकीमध्ये. कोळप्पा धोत्रे यांनी २०२४ विधानसभा व लोकसभा निवडणूक साठी व पक्ष बळकट वाढीसाठी माहिती व चर्चा करण्यात आली. ह्या पक्षाच्या चर्चा व बैठकीमध्ये.
पक्षप्रमुख कोळप्पा ह.धोत्रे यांनी भारतीय लोकशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे यांना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून भारतीय लोकशक्ती पक्ष महाराष्ट्रराज्य अध्यक्षपदी मा.श्री.तानाजी रामचंद्र कुऱ्हाडे यांची निवड करण्यात आली.
तर सौ.अनिता अनिल निकम यांची महिला महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून निवड झाली. व भगवान धोंडीराम कुंभार (वाशी)यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.व सुरेश कृष्णात कुंभार यांची भारतीय लोकशक्ती पक्ष चालक-मालक युनियन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली.
ह्यावेळी परशुराम मातीवडर(पन्हाळा तालुका उपाध्यक्ष), बजरंग पवार (तालुका कराड), सौ.सविता निकम(ग्रामपंचायत सदस्य नंदवाळ),सौ.शितल कोंडेकर,सौ.कमल उलपे, संगीता उलपे,सौ.विमल उलपे,सौ.सारिका कोंडेकर, एकनाथ पाटील, दिनकर भोईटे, अशोक लोखंडे, तानाजी पाटील व इतर उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे(कोल्हापूर)