बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावर यावल ते साकळी व किनगाव रस्त्याची खड्डयांमुळे दयनिय अवस्था

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावरील यावल ते साकळी व साकळी ते किनगाव या दरम्यानच्या रस्त्याची ठीकठीकाणी पडलेल्या खड्डयामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली असून ,

तात्काळ संबधीत विभागाने याकडे लक्ष वेधून रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी केली आहे . यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले आहे की ,

यावल शहराशी जोडला गेलेला बु्ऱ्हाणपुर ते अंकलेश्वर हा दोन प्रमुख राज्यांना जोडणारा मार्ग असुन , या मार्गावर मोठया प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसुन येते, अशा परिस्थितीत यावल ते साकळी व साकळी पासुन किनगाव पर्यंतच्या सुमारे १४ किलोमिटर रस्त्याची ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने या

मार्गावर झालेल्या भिषण अपघात होवुन अनेक निरपराध नागरीकांना आपले प्राण गमावले आहे . अशा गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष न देणे हे नागरीकांचे दुदैव म्हणावे लागेल अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली , मागील अनेक दिवसापासुन या रस्त्याच्या दुरूस्ती करीता वाहनधारका पासुन तर विविध सामाजीक संस्था आणी सर्वसामान्य नागरीकांकडुन वारंवार मागणी करण्यात आलेली असतांना

, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन या नागरीकांच्या जिवन मरणाशी संबंधीत विषयाकडे गांभीयाने लक्ष देत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत असून , प्रशासना तात्काळ या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती न केल्यास आपण राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजीत पवार यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती देवुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी सांगीतले .

Leave a Comment