दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.
गडचिरोली (दि….): गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे पंचायत समितीच्या वतीने आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण ९००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
त्यानुसार आज दि. ४ मार्च, २०१३ रोजी ग्रामीण आरोग्य केंद्र,आष्टी येथे मा.कुमार आशिर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी,जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील दिव्यांगत्व प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद,गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिंग,रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राथमिक तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या दरम्यान गडचिरोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. डॉ.देवरावजी होळी,माजी जि.प.सदस्या श्रीमती रुपाली पंदिलवार व श्री धर्मप्रकाश कुक्कुडकर,गट विकास अधिकार श्री.सागर पाटील, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी भिमराव वनखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विदान देवरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल हुलके,विस्तार अधिकारी श्री.बोरकुटे,विस्तार अधिकारी (सांखिकी) पेंदोर आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे करण्यात आले.
प्रसंगी आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथे शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली व उत्तम नियोजनबद्ध राबविण्यात येणा-या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची,जिल्हा व तालुका प्रशासनाची स्तुती करून पुढील शिबिराच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या.
सदर शिबिराच्या दुसया दिवशी सर्व प्रवर्गातील एकूण ६०७ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले.तसेच ४ दिवसात चामोर्शी तालुक्यातील ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या २३४७ दिव्यांग व्यक्तींपैकी एकूण २२४७ व्यक्तीची प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले,त्यापैकी अंदाजे १३८० पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) आणि शासनाच्या विविध योजनांचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे,दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले.
लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्याच्या आवश्यकतेनुसार साहित्य-उपकरणे देण्यात येईल.मागील १२ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ५७३७ दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आली आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ.इन्द्रजीत नागदेवते, डॉ,तारकेश्वर ऊईके,डॉ. सुमित मथनवार,डॉ.परिक्षित चकोले, डॉ.बाळू सहारे,डॉ.अजय कांबळे पूनम क्षिरसागर,डॉ. मनीष मेश्राम,डॉ. दिव्या गोस्वामी,अक्षय तिवाडे,उज्वल मोरे,प्रशांत खोब्रागडे,अजय खैरकर,अनुप्रिया आत्राम, ग्रामीण रुग्णालय आष्टी,तालुका आरोग्य विभाग,पंचायत समिती चामोर्शी,समग्र शिक्षा कार्यालय चामोर्शी,आष्टी
अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,आष्टी ग्राम पंचायतचे सरपंच,ग्रामसेवक, आशा,आशा गट प्रवर्तक तथा महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय येथील स्वंयसेवक विद्यार्थी तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.