(जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र फाऊंडेशनचा पुढाकार)
चामोर्शी:-जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड जंक्शन(मित्र फाउंडेशनच्या)सहकार्यातून समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
त्याचास एक भाग म्हणून चामोर्शी तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्ड देण्यासाठी चामोर्शी(३४),घोट(३३),चित्तरंजपूर(१९),तळोधी(२४) व बोरी(३४)अशा पाच केंद्रातील नियोजित ११० विद्यार्थ्यांपैकी १४४ विद्यार्थ्यांची दिनांक ३ व ४ फेब्रुवारी रोजी बुद्ध्यांक तपासणी व निदान शिबिर विशेष मोहीम मानसोपचार तज्ज्ञ देवयानी चोपडे,वृशाली विभूती,स्फृर्ती वाडीभस्मे, श्रद्धा वाळके,शशीकांत शंकरपुरे,अजय खैरकर,निलेश चहांदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले.
प्रसंगी या मोहिमेसाठी कार्यक्रम जिल्हा समन्वयक अभिजित राऊत,पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील,सहायक संवर्ग विकास अधिकारी भिमराव वनखंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ हुलके यांनी शिबिराला भेट देऊन तपासणी कक्ष,बैठक व्यवस्था,पिण्याचे पाणी व इतर महत्वाच्या सुविधांची पाहणी केली.तसेच स्वच्छ मुख अभियानाचे सुद्धा आयोजन करण्यात आले.
दरम्यान शिबिरात उपस्थित मान्यवरांनी पालकांशी व विद्यार्थ्यांशी हितगुज साधून शिबिरातील सोई सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता बाळगून उत्तम सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संसाधन शिक्षक यांनी प्रत्यक्ष विद्यार्थी व पालक यांच्या गृहभेटी देऊन नियोजनानुसार कार्यवाही केली.शिबिरामध्ये गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, शिक्षण विस्तार अधिकारी राणा सातपुते,केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,नरेंद्र कोत्तावार,समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक अविनाश पिंपळशेंन्डे,भाऊराव हुकरे, संजय नांदेकर,गट साधन केंद्र चामोर्शी येथील आयईडीचे विशेषज्ज्ञ सुशील गजघाटे,विषय साधनव्यक्ती विवेक केमेकर,चांगदेव सोरते,कु वंदना चलाख, संसाधन शिक्षक कु मेघा कोहपरे,उमेश पोहाने,रवी खेवले, जीवन शेट्टे,तसेच गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी, गावातील सरपंच,सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहुन उत्तम सहकार्य केले.