विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी समस्तआरोपींना अटक करा नातेवाईकांची मागणी

 

इस्माईल शेख सोबत अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील रहिवाशी नामदेव नारायण रायपुरे यांची मुलीचा दिनांक 24 /4 /2022 रोजी विवाह रीती रिवाजाप्रमाणे मुलीचे मोठे वडील नामदेव नारायण रायपुरे यांनी अकोला जिल्ह्यातील गणेश सहदेव गावंडे रा हाता ता बाळापूर जि अकोला यांच्याशी लग्न लावून दिले

परंतु मुलगी निकिता सहदेव गावंडे हिला लग्न झाल्यापासून शारीरिक त्रास व मानसिक छेड चालू होता मुलीचे वडील वारलेले असल्यामुळे मुलीचे मोठेबाबा मुलीची व मुलीच्या भावंडाचे जोपासन करतात मुलीच्या मोठे वडिलांनी पतीला शेत घेण्यासाठी सहा लाख दिलेले आहेत.

तरीही मुलीचा छड चालू होता मुलीने स्वतः शारीरिक त्रास सोसला परंतु कोणाला काही सांगितले नाही जास्त त्रास असल्यामुळे मुलगी निकिताने आत्महत्या केली पती गणेश सहदेव गावंडे व इतर राहणार हाता यांच्या विरुद्ध दिनांक 19 /1/ 2023 यांनी उरळ पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला सध्या आरोपी उरळ पोलीस स्टेशन जिल्हा अकोला मध्ये अटक आहेत बाकीचे आरोपी अद्याप पर्यंत अटक झालेले नाहीत निकिताचे मोठे वडिलांचे म्हणणे आहे की सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावे व आम्हाला न्याय देण्यात यावा.

अशी मागणी पोलीस तक्रारीमध्ये सदर महिलेच्या नातेवाईकांनी केलेली आहे

Leave a Comment