यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गावात राहणाऱ्या बेपत्ता झालेल्या विवाहीत महिलेचे जंगलात मृत अवस्येत मिळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे .
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की करसना सुभाष बारेला वय३० वर्ष राहणार गाडऱ्या तालुका यावल या आदीवासी विवाहीत महिलेचे प्रेत मिळुन आले आहे .
या संदर्भात काल दिनांक १२ जानेवारी सदरची महिला ही गाडऱ्या येथुन दिनांक ९ जानेवारी घरातुन हरविल्याची तक्रार देण्यात आली होती.
, याच घरातुन बेपत्ता झालेल्या महीलेचे प्रेत मृत अवस्थेत आढळुन आले आहे , या घटनेच्या संदर्भात महिलेच्या मृत अवस्थेत प्रेत मिळुन आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे संशय व्यक्त करण्यात येत असून , याबाबतची खबर गाडऱ्या गावाचे पोलीस पाटील केरसिंग घाटु बारेला यांनी खबर दिल्याने पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन ,घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे हे तपास करीत आहे .
गाडऱ्या येथे घटनास्थळी पोलीस उप निरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस नाईक युनुस तडवी, महीला पोलीस कर्मचारी ज्योती खराटे व गणेश ढाकणे व यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण , कर्मचारी बापु महाजन यांचे पथक रवाना झाले आहे .