खामगाव- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जळगांव जामोद तालुका तथा जिल्हा बैठक असलगांव येथे तालुका अध्यक्ष दत्तु दांडगे ह्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी अभिमन्यू भगत प्रदेश संघटक हे होते तर अध्यक्ष कैलासबापू देशमुख ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आली.
वरील बैठकीत घाटाखालील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून अनुप गवळी खामगांव यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून रामेश्वर गायकी संग्रामपूर व श्रीकृष्ण तायडे मलकापूर यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा सचिवपदी राजकुमार भड, जिल्हा संघटक आश्विन राजपूत, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल भगत, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख गोपाल अवचार तर जिल्हा सदस्य श्रीधर आव्हेकर, मनिष ताडे वरील प्रमाणे घाटखालील जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली वरील बैठकीच्यावेळी प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, अभिमन्यू भगत, मंगेश राजनकर, अनुप गवळी, रामेश्वर गायकी, राजकुमार भड, आश्विन राजपूत, गोपाल अवचार, दत्तु दांडगे , मनिष ताडे, संतोष कुलथे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वरील सत्कार कार्यक्रमाचे आयोजक आसीम खान निमगाव, मोहम्मद एजाज मोहम्मद आरीफ जळगाव जामोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन राजपूत तर प्रस्ताविक गणेश भड यांनी तसेच आभार प्रदर्शन संतोष कुलथे यांनी मानले. कार्यक्रम वेळी पत्रकार संतोष मांजरे, विनोद चिपडे , बाळु देशमुख संग्रामपूर ,गजानन सोनटक्के, अमर तायडे , अनिल भगत , विजय वानखडे , मंगल काकडे , अनिल दांडगे यांच्यासह जळगांव जामोद तालुक्यातील पत्रकार हजर होते.